5 lakh immediate assistance to family of person killed in tiger attack
चंद्रपूर : चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्यासाठी वनामध्ये गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभागाने बोपचे यांच्या कुटूंबास ५ लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान केला.
यावेळी देवराव भोंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, दिनकर सोमलकर, डॉ. गिरीधर येडे, मनोज पोतराजे, पप्पु बोपचे, प्रलय सरकार, आशिष ताजने व त्या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…