लाइफ स्टाइल

थंडीच्या दिवसांत करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, शरीर उबदार राहून मिळतील अनेक पोषक तत्त्वे

पुणे : हिवाळा सुरु होताच लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून जाते. कडाक्याच्या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लोक लोकरीचे कपडे वापरतात. मात्र, हिवाळ्यात काही खास गोष्टी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करतात. काही अन्नपदार्थ तुमचे शरीर तर उबदार ठेवतातच, त्याचबरोबर आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वेही देतात. ते खाल्ल्याने हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यताही कमी असते.

रताळे :
रताळ्यांमध्ये असलेल्या कॅलरीज आणि उच्च पोषक तत्वांमुळे शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. रताळे फायबर, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, रोगप्रतिकारशक्ती आणि जळजळीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

सलगम :
स्टार्चयुक्त सलगम या कंदामध्ये अँटिऑक्सिडंट आढळतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. हे व्हिटॅमिन-के आणि व्हिटॅमिन-ए चाही चांगला स्रोत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सलगमची पाने आपल्या एकूणच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी चांगली असतात. तसेच यामुळे हाडे मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते.

खजूर :
हिवाळ्यात मिळणारे खजूर हे कमी चरबीयुक्त असतात, जे वजन वाढण्याची समस्या उद्भवू देत नाहीत. पोषक तत्वांचे पॉवर हाऊस असलेले खजूर जिममध्ये जाणाऱ्यांसाठी एक उत्तम पदार्थ आहे. रोजच्या आहारात हे खाल्ल्याने हिवाळ्यात शरीर उबदार राहते.

बदाम आणि अक्रोड :
बदाम आणि अक्रोड यांचा संतुलित आहार आपली मज्जासंस्था सक्रिय ठेवतो. इन्सुलिन प्रक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी आपण जर्दाळूचेही सेवन करू शकता.

नाचणी :
हिवाळ्यात नाचणीमुळे आपल्या आरोग्यालाही खूप फायदा होतो. जर तुम्ही शाकाहारी आहार घेत असाल तर शरीरात कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी तुम्ही नाचणीची निवड करू शकता. याशिवाय नाचणी मधुमेहावर नियंत्रण ठेवते तसेच अॅनिमियामध्येही आराम देते. नाचणी निद्रानाश, चिंता आणि नैराश्यामध्ये देखील खूप प्रभावी आहे.

बाजरी :
बाजरीमध्ये भरपूर चरबी, प्रथिने आणि फायबर असतात. यामध्ये जास्त प्रमाणात आयर्न असल्यामुळे अॅनिमियामध्ये खूप फायदा होतो. याचे नियमित सेवन हाडे मजबूत करण्याचे काम करते. बाजरीचे लाडू किंवा बाजरीची रोटी बनवून तुम्ही याचे सेवन करू शकता.

ब्रोकोली आणि फ्लॉवर :
यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते. हे थंडीशी लढा देण्यास शरीरास मदत करतात आणि या हंगामात तुम्हाला सक्रिय ठेवतात.

थंडीच्या दिवसांमध्ये तूप, गूळ, तीळ, तुळशीची पाने आणि आलं यांचे सेवन देखील फायदेशीर ठरते.

थंडीची चाहूल! हिवाळ्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, ‘ही’ लक्षणे दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

7 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago