लाइफ स्टाइल

अंडी खाताना ‘या’ गोष्टीकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या…

स्वादिष्ट आणि पौष्टिक अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. परंतु, अंडी खाण्यापूर्वी जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर ती तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. त्यामुळे अंडे फ्राय करण्यापूर्वी किंवा उकडण्यापूर्वी ते तपासून घेणे केव्हाही चांगले.

यूएस कृषी विभागाने (USDA) जीवाणू असलेली अंडी कशी ओळखावी, याबद्दल माहिती दिली आहे. USDA नुसार, जर तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या भागात गुलाबी रंग दिसला तर ते लगेच फेकून देणे आवश्यक आहे. अंड्याच्या सामान्य रंगात बदल हे स्यूडोमोनास बॅक्टेरियाचे लक्षण असू शकते. या जीवाणूंनी संक्रमित अंडी खाल्ल्याने विषबाधा किंवा गंभीर समस्या उद्भवू शकते.

तज्ञांचे म्हणणे आहे की हा जीवाणू अंड्यात हलका हिरवा आणि पाण्यात विरघळणारा द्रव तयार करतो. जर तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये काही बदल दिसला तर ते खाण्याची चूक अजिबात करू नका. एक अभ्यास असेही सुचवितो की जर तुम्हाला अंड्यात गुलाबी किंवा इंद्रधनुष्यासारखा रंग दिसला तर ते फेकून द्या. हे अंडे स्यूडोमोनास बॅक्टेरियाने संक्रमित असू शकते. रंगाव्यतिरिक्त देखील आपण अशी अंडी ओळखू शकता.

पोल्ट्री सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, खराब झालेल्या अंड्यांना काहीसा आंबट, खराब किंवा फळांसारखा वास येतो. अशा अंड्यांच्या जर्दीवर पांढरा आणि तंतुमय थर येतो, जो नंतर हलका तपकिरी पडतो. तथापि, अंड्याचा पांढरा रंग बदलणे नेहमीच खराब होण्याचे लक्षण नसते. USDA च्या मते, अनेकदा अंड्यातील जर्दीचा पिवळा रंग कोंबड्यांच्या आहारावर अवलंबून असते. अन्न प्राधिकरणाच्या तज्ञांचे म्हणणे आहे की, जर कोंबडीला खाण्यात पिवळ्या किंवा केशरी रंगाचे पदार्थ मिळाले तर जर्दीचा रंग गडद पिवळा असतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अंडी घरात आल्यानंतरही त्याच कार्टनमध्ये ठेवावीत ज्यात आणली जातात. तसेच अंडी फ्रीजरमध्ये ठेवताना, आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अंडी रेफ्रिजरेटरमध्ये 45 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवावी. यामुळे अंडी खराब होण्याचा धोका कमी होतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago