काम-धंदा

SBI Recruitment 2022 : SBI मध्ये ऑफिसर कॅडरच्या पदांसाठी भरती, 20 लाख ते 60 लाख रुपये वार्षिक पगार

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक जॉबसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली जाऊ शकते.

SBI ने 9 डिसेंबरपासून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले पात्र उमेदवार 29 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती अंतर्गत, सर्व पात्रता निकषांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बँकेच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल.

SBI रिक्त जागा 2022

  • उपव्यवस्थापक – 16 पदे
  • वरिष्ठ कार्यकारी – 17 पदे
  • कार्यकारी – 02 पदे
  • वरिष्ठ विशेष कार्यकारी – 01 पद
  • डेटा प्रोटेक्शन ऑफिसर – 01 पद
  • असिस्टंट डेटा ऑफिसर – 01 पदे
  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्ट – 16 पदे

कोणत्या पदासाठी किती पगार?

  • डेप्युटी मॅनेजर: 48170-1740/1-49910-1990/10-69810 चे वेतनमान
  • वरिष्ठ कार्यकारी: वार्षिक 24 लाख रुपये CTC
  • कार्यकारी: वार्षिक 20 लाख रुपये CTC
  • वरिष्ठ विशेष कार्यकारी: वार्षिक CTC रु. 27 लाख
  • डेटा प्रोटेक्शन ऑफिसर: वार्षिक ६० लाख रुपये CTC
  • असिस्टंट डेटा ऑफिसर: वार्षिक 35 लाख रुपये CTC
  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 63840-1990/5-73790-2220/2-78230
  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 76010-2220/4-84890-2500/2-89890

SBI भर्ती 2022 मध्ये अर्ज कसा करावा?

  1. सर्व प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in/web/careers च्या करिअर पेजवर जा.
  2. येथे होम पेजवर स्पेशालिस्ट कॅडर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  3. त्यानंतर ऑनलाइन अर्जासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  4. येथे स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज अचूक भरा.
  5. त्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी जमा करा.
  6. सबमिट बटणावर क्लिक करा.
  7. पुढील संदर्भासाठी कंफर्मेशन पेज ची प्रिंट आउट घ्या.

पात्रता निकष आणि अर्ज शुल्क

SBI च्या भरती अंतर्गत, अनारक्षित म्हणजे सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील अर्जदारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार sbi.co.in/web/careers या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेत वेतनश्रेणी, रिक्त पदांचे तपशीलवार वर्णन, पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील तपासू शकतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

37 मिनिटे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago