काम-धंदा

नोकरीची संधी : आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या कसे अर्ज करणार..

आयडीबीआय बँकेच्या एकूण १३४ रिक्त जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करु शकतात. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – २४ डिसेंबर २०२०
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०२१

कुठल्या पदाच्या किती जागांसाठी भरती ?

    1. डेप्युटी जनरल मॅनेजर  –  ११
    2. असिस्टंट जनरल मॅनेजर –  ५२
    3. मॅनेजर –  ६२
    4. असिस्टंट मॅनेजर – ९

शैक्षणिक पात्रता – एकूण १३४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पोस्टनुसार वेगवेगळी आहे. कुठल्या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी idbibank.in/careers या लिंकवर क्लिक करुन संपूर्ण जाहिरात पाहा.

महत्वाच्या सूचना :

  1. या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवार केवळ एका पदासाठीच अर्ज करु शकतो.
  2. अर्ज नोंदणीची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा फी ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी जमा करण्यात येईल.
  3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतरही पात्रता पूर्ण केल्याचे सुनिश्चित करावे.
  4. उमेदवार भारतातील कुठल्याही शाखेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्याने आपला अर्ज सादर करावा.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago