काम-धंदा

कार लोन घेताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि करा पैशांची मोठी बचत

कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्‍याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल.

तज्ज्ञांचे मत आहे कि, कारचे मॉडेल निवडण्यापूर्वी तुम्हाला कर्जाच्या पात्रतेबद्दल माहिती मिळाली पाहिजे. म्हणजेच आपल्याला किती कर्ज मिळू शकते हे आपल्याला स्पष्टपणे माहित असायला हवं. हे आपल्या पगारावर तसेच कर्जाच्या कालावधीवरही अवलंबून असते. आपण याबद्दल विविध पोर्टलच्या मदतीने माहिती मिळवू शकता. वेगवेगळ्या बँका तुम्हाला पाच वर्ष ते सात वर्षांपर्यंतचे कार लोन देतात. येथे हे लक्षात घ्या की, दीर्घ काळासाठी कार लोन घेतल्यास आपली ईएमआय कमी होते परंतु आपल्या कारची एकूण किंमत वाढते.

कार लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या :

  1. जर आपण कार कर्जासाठी अर्ज करणार असाल तर सर्व प्रथम ईएमआय म्हणून आपण किती रक्कम देऊ शकता याकडे लक्ष द्या. यासाठी तुम्हाला आधीपासून चालू असलेले एखादे कर्ज तसेच तुमच्या घरातील खर्च, गुंतवणूक अशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. त्या आधारे आपण कारचे मॉडेल निवडू शकता.
  2. बँका कोणत्याही प्रकारच्या कर्जावर उत्पन्नाचे स्त्रोत, लिंग आणि क्रेडिट स्कोअर या निकषांवर व्याज आकारतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल. जर क्रेडिट स्कोर कमी असेल तर आपल्याला उच्च दरासह कर्ज मिळेल. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर तपासणे आवश्यक आहे.
  3. वेगवेगळ्या बँकांकडून कर्जाच्या ऑफरची तुलना करण्याची गरज असते.
  4. कर्ज घेताना व्याजदराबरोबरच प्रक्रिया शुल्काचा (प्रोसेसिंग फी) विचार केला पाहिजे. अनेक बँका सणासुदीच्या काळात प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) माफ करतात, परंतु आपण या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रक्रिया शुल्क माफ करण्याच्या बदल्यात बँका आपल्याकडून जास्त व्याज किंवा इतर कोणते शुल्क तर आकारत नाही ना. याखेरीज, फोरक्लोजर चार्जेस आणि प्री-पेमेंट शुल्क या सर्व बाबींची संपूर्ण माहिती मिळवायला हवी.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago