hyderabad girl deepthi narkuti gets a rs 2 crore per annum job at microsoft
पुणे : हैदराबादमधील दीप्ति नारकुतीला मायक्रोसॉफ्टने २ कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति आता मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणार आहे. अमेरिकेत टेक जाएंटच्या हेडक्वॉर्टर Seattle मध्ये काम करणार आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच एमएस कम्प्यूटर्सचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडामधून पूर्ण केले आहे. मायक्रोसॉफ्ट शिवाय, दीप्तिला गोल्डमॅन सॅक्स आणि अॅमेझॉनकडून जॉब ऑफर आली आहे. परंतु, तिनं मायक्रोसॉफ्टला पसंती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ति नारकुतीने फ्लोरिडा विद्यापिठात जाण्याआधी तिने हैदराबादमधील उस्मानिया कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून बीटेक पूर्ण केले होते. त्यानंतर ती अमेरिकेच्या निवेश बँक आणि आर्थिक सेवा कंपनी जेपी मॉर्गन मध्ये एक सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम केले होते. तिनी २०१४ ते २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्ट स्टूडेंट असोसिएट म्हणून काम केले. दीप्तिचे वडील डॉ. वेंकन्ना हैदराबाद पुलिस कमिश्नरेट मध्ये फॉरेंसिक तज्ज्ञ आहेत. दीप्तिला फ्लोरिडा विद्यापीठात कॅम्पसमध्ये मुलाखती दरम्यान निवडलेल्या ३०० विद्यार्थ्यांपैकी सर्वात आकर्षक पॅकेज दिले आहे.
तेलंगानाचे पोलीस महासंचालक (DGP) च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दीप्तिचे अभिनंदन केले आहे. एका पोस्टमध्ये म्हटले की, एन. दीप्ति, डी/ओ डॉ. वेंकन्ना गारू (आमचे फोरेंसिक तज्ज्ञ) ला हार्दिक शुभेच्छा. २ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज सोबत #SoftwareDevelopmentEngineer @Microsoft, USA चे पद मिळाले आहे. या यशाबद्दल #TelanganaPoliceFamily कडून हार्दिक शुभेच्छा. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…