तब्येत पाणी

हळद- मधाचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…

हळद मधासह एकत्रित केली जाते, याला गोल्डन हनी म्हणूनही ओळखले जाते, हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा समावेश आहे. आपण या शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिककडे दुर्लक्ष करू शकत नाही. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात पाश्चात्य औषधांमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. भारतात या दोन्ही पदार्थांचा अनेक शतकांपासून विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापर केला जात आहे.

हळद ही भारतातील वनस्पती आहे. ती प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात असतेच. परंतु, तिचे फायदे किती असामान्य आहेत हे अनेक जणांना अजूनही माहीत नाहीत. हळदीमध्ये मज्जासंस्थेचे संरक्षण करण्याची क्षमता असते. तसेच ती दाहक-विरोधी, अँटीव्हायरल, बुरशीविरोधी, ट्यूमरविरोधी एक विलक्षण प्रतिजैविक आहे. तिच्यात रोग निर्माण करणारे जीवाणू नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. मधात देखील अँटीव्हायरल, बुरशीविरोधी आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात.

हळद- मधाचे फायदे :

  1. हळद आणि मध यांचे मिश्रण दाहक-विरोधी असते.
  2. या मिश्रणाचे सेवन केल्याने अपचनाची समस्या दूर होते.
  3. थंडी, सर्दी-पडसे, खोकला या समस्या असल्यास अर्धा चमचा मध आणि हळद यांचे मिश्रण खा आणि काही वेळ पाणी पिऊ नका. आपण त्याच्याबरोबर तुळशीचे देखील सेवन करू शकता.
  4. जेवणानंतर हळदीचे सेवन करणे मूत्रपिंड आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते.
  5. हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
  6. त्वचेसाठी फायदेशीर : त्वचेच्या समस्यांपासून जसे की फ्रिकल्स, सुरकुत्या, डाग इत्यादींपासून मुक्त होण्यासाठी हळद, मध आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवा आणि थोडीशी सुकेपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा, याचा त्वचेला खूप फायदा होतो.
  7. हळद आणि मध यांचे मिश्रण वीर्य पातळ असणे आणि शीघ्रपतन या समस्यांवर रामबाण उपाय आहे. यासाठी फक्त एक चमचा मध मिसळून एक चमचा हळद पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी खावी.
  8. हळद कर्करोगाच्या पेशी आणि ट्यूमरची वाढ थांबवते.
  9. यात नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे विषारी घटक शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होते.
  10. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते असेही मानले जाते.
  11. शरीरातील चरबी साठवण्याची क्षमता कमी करते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आवश्यक ठरते.

आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला

गर्भपाताच्या गोळ्या घेताय? जाणून घ्या वापर, फायदे, तोटे आणि गर्भपाताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

10 तास ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago