तब्येत पाणी

गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया…

पुणे :  साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया…

गुळाचा चहा पिण्याचे फायदे :

  1. सर्दी, पडसे, खोकल्यावर प्रभावी – सर्दी आणि खोकला झाल्यास आजही घरातील जुनी लोकं गुळ आणि हळद खाण्याचा सल्ला देतात. किंवा दुधामध्ये गुळ आणि हळद मिसळून पिण्याचा सल्ला देतात.
  2. मुरुमाची समस्या – जास्त तेलकट खाल्ल्याने, धुळीमुळे किंवा पित्ताचा त्रास असल्यास चेहऱ्यावर मुरूम येतात. मात्र रोज थोडा गूळ खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते.
  3. ऍनिमिया – गुळात लोह खनिज जास्त असल्याने रोज सकाळी पाण्यासोबत याचे सेवन केल्यास ऍनिमियाचा त्रास कमी होतो.
  4. एनर्जी देण्याचे काम  – थकवा जाणवत असल्यास किंवा ऊन लागल्यास गुळाच्या चहाचे सेवन केल्याने आराम मिळतो आणि शरीराला एनर्जी देण्याचे काम गूळ करतो.
  5. पचनक्रिया सुधारते  – दम्याचा त्रास असल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते.
  6. घशाला आराम – घसा खवखवत असल्यास किंवा घसा बसल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो.
  7. हिमोग्लोबिन वाढते – रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.
  8. रक्त वाढते  – गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा तुमची ही समस्या दूर करेल.

गुळाचा चहा कोणी पिऊ नये..?

  1. डायबेटीसच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिऊ नये. कारण गुळाचा चहा पिण्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गुळाचा व साखरेचा चहा पिणे टाळावे.
  2. आमवातचा त्रास असल्यास गुळाचा चहा पिणे टाळावे. कारण गुळात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने आमवातात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते.

गुळाच्या चहामुळे होणारे नुकसान  :

  1. दिवसभरात एक ते दोनवेळा चहा पिणे पुरेसे असते. मात्र दिवसभरात वरचेवर चहा पित राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. याला गुळाचा चहाही अपवाद नाही.
  2. गुळाचा चहा अधिक पिण्यामुळे यातील कॅलरीजमुळे अधिक वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृदयविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
  3. गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते.
  4. 100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 385 कॅलरी असतात. त्यामुळं डाएट करणाऱ्यांनी याचं सेवन प्रमाणात करावं. पण, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे सेवन फायद्याचं ठरतं.
  5. गरम वातावरणात गुळाचे सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळं याचे विपरीत परिणाम त्वचेवरही दिसून येतात.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago