ग्लोबल

दोन विमानांची हवेतच भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू

पॅरिस : फ्रान्समध्ये भीषण विमान दुर्घटनेमध्ये तब्बल ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. पश्चिम फ्रान्समध्ये ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४.३०च्या सुमारास दोन विमानांमध्ये टक्कर झाली होती. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते. या विमानाने डीए४० या प्रवासी विमानाला भीषण धडक दिली. या प्रवासी विमानात ३ जण प्रवास करत होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर मायक्रोलाईट विमान एका घराजवळ पडलं तर दुसरे प्रवासी विमान निवासी भागापासून दूर अंतरावर पडले असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हवेतच भीषण धडक झाल्यामुळे या विमानांनी पेट घेतला. घटनास्थळी जवळपास ५० अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी कोसळलेल्या विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने घराजवळ विमान पडल्यानंतर कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. पण विमानात असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago