The young man died after being shot while shooting a prank
अमेरिकेत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रँक करणं एका २० वर्षीय तरुणाला इतकं महागात पडलं की त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. प्रँक व्हिडिओ शूट करणाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. एक २० वर्षीय तरुण दरोड्याचा प्रँक व्हिडिओ बनवत होता. पण, ज्या व्यक्तींवर तो हा प्रँक करत होता, त्यांनी त्याला खरोखरचा चोर समजून गोळी घातली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
वृत्तानुसार, अमेरिकेतल्या टेनेसी मध्ये ही घटना घडली. मृत तरुण रात्री युट्यूबसाठी प्रँक व्हिडिओ शूट करत होता. पण ज्यांच्यावर तो प्रँक शूट करत होता त्या ग्रुपमधील एका व्यक्तीने त्याला चोर समजून त्याच्यावर गोळी झाडली. नॅशविल्ले पोलिसांना रात्री 9.25 मिनिटांनी गोळी झाडल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर 20 वर्षीय टिमोथी विल्क्स याचा मृतदेह दिसला. 23 वर्षीय डेविड स्टार्न्स ज्युनियर नावाच्या तरुणाने त्याला गोळी मारली. उपस्थितांनी सांगितलं की तो प्रँक व्हिडिओ शूट करत होता. अद्याप घटनेचा तपास सुरू आहे.
विल्क्स आपल्या एका मित्रासोबत एका ग्रुपकडे गेला. दरोड्याचा प्रँक करताना विल्क्स खरोखर चोर असल्याचा स्टार्क्सचा समज झाला आणि लगेच त्याने गोळी झाडली. स्टार्क्सने पोलिसांना सांगितलं की, त्याला प्रँकबाबत काहीही कल्पना नव्हती. त्याने स्वतःच्या बचावासाठी गोळी चालवली असं त्याने पोलिसांना सांगितलं. दरम्यान पोलिसांनी अद्याप विल्क्सच्या मृत्यूप्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. परंतु पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…