Teenager Kills Himself While Shooting Tiktok Video In Swat
स्वात (पाकिस्तान) : एका १९ वर्षीय युवकाने शॉर्ट व्हिडिओ बनवण्याच्या नादात आपले प्राण गमावले आहेत. आत्महत्येचा व्हिडिओ चित्रीत करत असताना बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानमधील स्वातमधील कबाल तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉक स्टार हमीदुल्लाह हा युवक टिकटॉक व्हिडिओ बनवत होता. त्यासाठी आत्महत्येवर आधारित एक दृश्य तो चित्रित करत होता. मात्र, बंदुकीतून गोळी झाडली गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हमीदुल्लाह आत्महत्येचे दृष्य चित्रित करत होता. त्यासाठी त्याने एक बंदुक मिळवली होती. मात्र, त्या बंदुकीत बुलेट असल्याचं त्याला माहित नव्हतं. हमीदुल्लाह याने या व्हिडिओसाठी एक दुखद पार्श्वसंगीतही तयार केले होते. एका डोंगराजवळ त्याने व्हिडिओ तयार करण्यास सुरूवात केली. त्याच्याबरोबर त्याचे काही मित्रदेखील होते. व्हिडिओ चित्रित करत असताना त्याने बंदुक आपल्या कानशिलावर ठेवली आणि गोळी झाडली. गोळी सुटली आणि त्यातच हमीदुल्लाह नावाच्या या युवकाचा मृत्यू झाला. क्षणात घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे त्याचे मित्र खूप घाबरले. ते हमीदुल्लाह याला उठवत होते. पण तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…