ग्लोबल

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इमिग्रेशनबाबत ‘या’ आदेशांवर केल्या स्वाक्षऱ्या, हजारो भारतीयांना मोठा दिलासा,

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही निर्णय राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बदलण्यास सुरुवात केली आहे. बालकांची त्यांच्या कुटुंबीयांपासून ताटातूट करणारे अमेरिकेतील याआधीच्या ट्रम्प प्रशासनाचे जाचक इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन सरकारी आदेशांवर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडनयांनी स्वाक्षऱ्या केल्या.

अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. बायडन यांनी या निर्णयाबाबत व्हाइट हाउसमध्ये बोलताना स्पष्ट केलं कि, ‘मी नवीन कायदे तयार करत नाही, तर वाईट धोरण संपुष्टात आणत आहे. नवीन आदेशामुळे कायदेशीर इमिग्रेशन यंत्रणा अधिक न्याय्य, सुव्यवस्थित आणि माणुसकीपूर्ण होईल, यामुळे देश अधिक मजबूत, सुरक्षित आणि संपन्न होईल आणि सीमांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने होईल.

इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन आदेश :

  1. ताटातूट झालेल्या कुटुंबीयांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे. (बेकायदा इमिग्रेशन रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने ५,५०० कुटुंबीयांची ताटातूट केली होती, त्यापैकी ६००हून अधिक बालकांच्या पालकांचा अद्याप शोध लागलेला नाही.)
  2. स्थलांतराच्या मूळ कारणावरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार
  3. स्थलांतरितांनी समाजात मिसळून जावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago