ग्लोबल

दिलासादायक: ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाला लसीची चाचणी सुरु करण्यास पुन्हा परवानगी

जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थांबवण्यास सांगितले होते.

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात असताना चाचणीत सहभागी असलेली एक व्यक्ती आजारी पडली होती. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. अ‍ॅस्ट्राझेनेकाने याबाबतची माहिती दिली होती.

या लसीला एझेडडी -1222 (AZD1222)असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो स्वयंसेवकांचा सहभाग आहे. आता पुन्हा या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago