ग्लोबल

Video : अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे ६० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

अमेरिका : अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया भागात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बर्फामुळे अंधुक वातावरण निर्माण झाल्याने समोरचं काहीही दिसू न शकल्यानं जवळपास ६० गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर २४ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी स्चुयलकिल काउंटीमध्ये महामार्गावर हा अपघात घडला. एकमेकांवर आदळलेल्या बऱ्याचशा गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. बर्फवृष्टीमुळे अंधुक वातावरण पसरल्याने या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी गाड्यांतील चालक आणि प्रवाशांनी गाड्या रस्त्यातच सोडून पळ काढला. हा संपूर्ण रस्ता डोंगराळ भागातील असून बचाव मोहीम सुरू आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्चुयलकिल काउंटीमध्ये ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कार घसरून एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. अपघातामुळे काही वाहनांनी पेट घेतल्याचं देखील दिसत आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं. सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच त्वरित आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago