ग्लोबल

‘या’ ३२७ वस्तूंची आता चीनमधून आयात करण्याची गरज नाही

भारत-चीन व्यापारामध्ये मोठया प्रमाणावर असमतोल आहे. आपण चीनकडून आयात करतो त्या तुलनेत चीनला निर्यात करत नाही. व्यापारामध्ये अनेक वस्तुंसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. हे कमी करण्यासाठी आरआयएस (संशोधन व माहिती प्रणाली) ने अभ्यास करुन काही चांगले पर्याय सुचवले आहेत.

चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील ३२७ वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे, तसेच भारतातही याचे उत्पादन केले जाऊ शकते. या ३२७ वस्तुंमध्ये मोबाइल फोन्स, टेलिकॉम उपकरणे, कॅमरा, सौर पॅनल, एसी, पेनिसिलन औषधांचा समावेश होतो. चीनकडून होत असललेल्या एकूण आयातीमध्ये या ३२७ वस्तुंचा तीन चतुर्थांश वाटा आहे. भारतात चीनमधून एकूण ४,०४४ उत्पादने आयात केली जातात. यात ३,३२६ उत्पादने आहेत, ज्यात फार स्पर्धा नाहीये. मात्र ३२७ (१० टक्के) सेंसिटिव उत्पादने आहेत.

सरकारने मार्च महिन्यापासूनच पर्यायी आयातीचे मार्ग शोधायला सुरुवात केली. अलीकडच्या काही वर्षात चीन इलेक्ट्रॉनिक, रसायने आणि औषध निर्मिती क्षेत्रातील उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनला आहे. जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने सुरु केले. हे कारखाने चीनमधून जगातील अन्य देशांना मालाची निर्यात करतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago