ग्लोबल

बैरुत स्फोटांमुळे लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांचा संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा

लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी बैरुत स्फोटांमुळे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला, त्यामुळे आठवडाभरात सरकार पायउतार झालं आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी देशाला संबोधताना सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली.

बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु झाली. तिथल्या सरकारविरोधात जनक्षोभ वाढला. पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र संपूर्ण सरकारनेच राजीनामा देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पंतप्रधानांनी संध्याकाळी देशाला संबोधताना राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला. परंतु नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत पदावर कायम राहा, असं राष्ट्रपतींनी पंतप्रधान हसन दियाब यांना सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago