ग्लोबल

सेक्स डॉल मार्गोला बॉडीबिल्डर युरीने दिला घटस्फोट, आता महिलेबरोबर डेट करण्यास तयार पण..

कझाकिस्तान : आपण जगभरात अशा अनेक बातम्या ऐकल्या असतील, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण वाटते. अशीच एक घटना कझाकिस्तानमधून समोर आली आहे. वास्तविक, कझाकस्तानचा बॉडीबिल्डर युरी टोलोचको, ज्याने एका सेक्स डॉलशी लग्न केले होते, तो आता एखाद्या महिलेबरोबर डेट करण्यास तयार आहे, परंतु त्याने त्यासाठी एक अट ठेवली आहे.

डेली रिपोर्टनुसार, युरी टोलोचको यांनी शुक्रवारी यूकेस्थित FUBAR रेडिओवरील “द डेटिंग शो” या डेटिंग कार्यक्रमात सांगितले ते पूर्वी सात वर्षांच्या एका खऱ्या नात्यात होते आणि आता पुन्हा एकदा ते महिलांबरोबर नातं जोडण्यासाठी तयार आहेत.

बॉडीबिल्डरने केले सेक्स डॉलबरोबर लग्न, लग्नाची व्हिडिओ क्लिप व्हायरल

युरी टोलोचको यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये आठ महिने डेटिंग केल्यानंतर आपली सेक्स डॉल मार्गोबरोबर पहिले लग्न केले होते आणि आता पुन्हा महिलांशी संबंध ठेवण्यास तयार आहे. युरीने आपली पहिली सेक्स डॉल मार्गोला घटस्फोट दिला आहे आणि आपल्या नवीन डॉल लूना आणि लोला यांच्याशी नवीन संबंध बनवले आहे. बॉडीबिल्डर युरीने म्हटले आहे की तो आता महिलांबरोबर संबंध ठेवण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी त्या व्यक्तीलाही त्याची सेक्स डॉल आवडायला हवी.

युरी याचे स्पष्टीकरण देताना म्हणाले की, “मी जवळजवळ सात वर्षे एका खऱ्या नात्यात होतो. हे माझ्यासाठी मनोरंजक आणि महत्वाचे आहे आणि कदाचित माझ्याकडे भविष्यात एक वास्तविक व्यक्ती असू शकेल, परंतु हे महत्वाचे आहे की त्या व्यक्तीला देखील माझी डॉल आवडायला हवी.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago