ग्लोबल

शतकातील सर्वात मोठा लिलाव, गांधीजींचा चष्मा विकला गेला इतक्या कोटींना…

ब्रिटनच्या एका लिलाव संस्थेने महात्मा गांधींच्या चष्म्याचा  २,६०,००० पौडांना (जवळपास २.५५ कोटी रुपये) लिलाव केला. हा चष्मा महात्मा गांधींनी वापरला असून नंतर तो कुणालातरी भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या एका व्यक्तीने बोली लावून हा चष्मा विकत घेतला. हा चष्मा १०,००० ते १५,००० पौडांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण ऑनलाईन लिलावात बोली वाढत गेली.

लिलाव संस्थेने सांगितले की यात भारत, कतार, अमेरिका, रशिया, कॅनेडासह जगभरातील लोकांनी बोली लावली. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शनच्या अँडी स्टोव्ह यांनी शुक्रवारी बोलीची समाप्ती करताना सांगितले, ‘असाधारण वस्तूची असाधारण किंमत, ज्यांनी बोली लावली त्या सर्वांचे आभार.’

स्टोव्ह यांनी सांगितले की, ईस्ट ब्रिस्टल ऑक्शनसाठी ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि त्यांनी या लिलावाला ‘शतकातील सर्वात मोठा लिलाव’ म्हटले आहे. ते म्हणाले, ‘हा चष्मा पन्नास वर्षांपर्यंत कपाटात ठेवला होता. विक्रेत्याने मला सांगितले होते की हा कुणाच्या कामाचा नसेल तर फेकून द्या. आता त्याला इतके पैसे मिळतील की त्याचे आयुष्यच बदलून जाईल.’

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव..

या चष्म्याचे नवे मालक एक संग्राहक आहेत. नैऋत्य इंग्लंडच्या साऊथ ग्लॉस्टरशायरच्या मंगोस्टफील्डच्या एका वृद्ध रहिवाशाने हा चष्मा लिलावासाठी दिला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की, त्यांच्या एका नातेवाईकांना हा चष्मा भेट म्हणून मिळाला होता जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत १९१० ते १९३० यादरम्यान ब्रिटिश पेट्रोलियममध्ये काम करत होते. चष्म्याच्या खरेपणाबद्दल स्टोव्ह म्हणाले, विक्रेत्याने जी कहाणी सांगितली ती अगदी तशीच आहे जशी त्यांच्या वडिलांनी पन्नास वर्षांपूर्वी सांगितली होती. असे मानले जात आहे की दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या वर्षांमध्ये गांधीजींकडे हा चष्मा होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago