Second-Presidential-Debate
ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले असले तरी ते करोनामुक्त झाल्याचं अद्याप सांगण्यात आलेलं नाही. तसेच, ट्रम्प अद्याप करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळली पाहिजे, असं मत जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे.
मंगळवारी बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “अनेक जण करोनाबाधित होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मला क्लेवलँड क्लिनिकच्या डॉक्टरांकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती आता कशी आहे याबाबत मला माहिती नाही. मी त्यांच्यासोबत डिबेटसाठी तयार आहे. परंतु अशी आशा करतो की सर्व प्रोटोकॉल्सचं पालन केलं जाईल,” असं बायडेन म्हणाले.
१५ ऑक्टोबर रोजी मियामीमध्ये होणाऱ्या प्रेसिडेन्शिअल डिबेटसाठी आपण तयार असल्याचं मंगळवारी ट्रम्प यांनी ट्वीट करत सांगितलं होतं. १५ ऑक्टोबर रोजी मियामी येथे दुसरी तर २२ ऑक्टोबर रोजी टेनेसेच्या नॅशविले मध्ये तिसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट होणार आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…