गॅझेट्स

iPhone युजर्सना धक्का : अॅप्स आणि इन अॅप्स साठी मोजावे लागणार जास्त पैसे

अॅपल आयफोन युजर्ससाठी ही महत्वाची बातमी आहे. लवकरच अॅपल युजर्सना अॅप्स आणि इन अॅप्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, साउथ आफ्रिका आणि रशिया यासारख्या ६ देशात Apple App Store आपल्या दरांमध्ये वाढ करणार आहे.

अॅपलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, टॅक्स वाढल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. भारतात इंटरनेट कंपन्यांवर १८ टक्के जीएसटी त्याशिवाय २ टक्के equalisation levy टॅक्स लावला जातो. इक्वलायजेशन लेवी एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्स आहे. जो विदेशी टेक कंपन्यातून डिजिटल ट्रान्झक्शन द्वारे कमाईतून घेतला जातो. याच प्रमाणे इंडोनेशियात डेव्हलपर्सला १० टक्के नवीन टॅक्स द्यावा लागतो.

अॅपलने म्हटले, ज्यावेळी टॅक्स किंवा फॉरेन एक्सचेंज रेट मध्ये बदल केला जातो. त्यावेळी कधी-कधी अॅप स्टोरवर किंमती अपडेट करणे गरजेचे असते. पुढील काही दिवसांत अॅप स्टोरवर अॅप्स आणि इन अॅप्स खरेदीवरच्या किंमतीत ब्राझील, कोलंबिया, भारत, इंडोनेशिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिका मध्ये वाढ करणार आहे. कंपनीने सांगितले की, युजर्संना अॅपल डेव्हलपर पोर्टलच्या My Apps मध्ये उपलब्ध असलेल्या Pricing and Availability सेक्शनमध्ये जावे लागेल. परंतु, अॅपलच्या स्वतःच्या सर्विस जसे Apple Music, Apple TV+ यांच्या किंमतीत बदल होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago