Jio's offer
एअरटेल आणि Vi नंतर रिलायन्स जिओनेही आपले प्रीपेड प्लॅन दर वाढवण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओचे नवे दर १ डिसेंबरपासून लागू होतील. नवीन दर लागू झाल्यानंतर, प्रीपेड प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना 500 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत.
कंपनीने JioPhone वापरकर्त्यांसाठी अमर्यादित प्लॅनची (अनलिमिटेड प्लॅन) किंमतही वाढवली आहे. या प्लॅनची किंमत आता 91 रुपयांपासून सुरू होईल. यापूर्वी त्याची किंमत 75 रुपये होती. जिओ वापरकर्त्यांसाठी सर्वात कमी किंमतीचा अमर्यादित प्लॅन आता 155 रुपयांपासून सुरू होईल. त्याची किंमत आधी 129 रुपये होती. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा दिला जातो. याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 300 एसएमएस देखील दिले जातात.
जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला 179 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत 239 रुपये करण्यात आली आहे. 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 1.५ GB डेली डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसचे फायदे देखील आहेत.
कंपनीचा 249 रुपयांचा लोकप्रिय प्लॅनही महाग झाला आहे. त्यासाठी आता ग्राहकांना 299 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटासह अमर्यादित कॉल आणि 100 SMS दिले जातात.
कंपनीने डेटा ऍड-ऑन पॅकही महाग केले आहेत. Jio चा 251 रुपयांचा डेटा पॅक आता 301 रुपयांचा असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना ५० GB डेटा दिला जातो. त्याची वैधता 30 दिवसांची आहे. कंपनीने इतर प्लॅनही महाग केले आहेत. नवीन दर लागू झाल्यानंतर रिलायन्स जिओच्या प्लॅनची किंमत जवळपास 21 टक्क्यांनी महागणार आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…