मनोरंजन

दु:खद! ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे हृदयविकाराने निधन

मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील.

मिथिलेश यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिथिलेश चतुर्वेदी यांनी गेली अनेक दशके मनोरंजन क्षेत्रात काम केले. त्यांनी हृतिक रोशनसोबत कोई मिल गया, सनी देओलसोबत गदर एक प्रेम कथा, सत्या, बंटी और बबली, क्रिश, ताल, रेडी, अशोका आणि फिजा यासह काही मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अनेक जाहिराती आणि टीव्ही शो देखील दिसले होते. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत गुलाबो सिताबो हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ते  ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा भाग होते. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2020 मध्ये ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये ते दिसले होते. मिथिलेश चतुर्वेदी सध्या Banchhada नावाच्या चित्रपटात काम करत होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago