मनोरंजन

धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच उपचार सुरू राहणार

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कुटुंबाने आता घरीच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्मेंद्र यांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. प्रतीक समदानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “धर्मेंद्र गेल्या काही आठवड्यांपासून कधी रुग्णालयात दाखल होत होते आणि पुन्हा घरी जात होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचार आणि काळजी त्यांच्या घरीच घेतली जाणार आहे.”

धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर जुहू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील रस्ता काही काळासाठी बंद ठेवला होता.

१० नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तत्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे काही काळासाठी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, सनी देओलच्या टीमने मंगळवारी एक निवेदन जारी करून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. निवेदनात म्हटले आहे, “धर्मेंद्र आता बरे होत आहेत. कृपया त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.”

याचदरम्यान, ११ नोव्हेंबरच्या सकाळी काही माध्यमांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबतची खोटी बातमी प्रसिद्ध केली होती. या अफवेवर त्यांच्या कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली. धर्मेंद्र यांच्या कन्या ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “अशा निराधार आणि गैरजबाबदार बातम्या पसरवणे अत्यंत दुर्दैवी आहे. धर्मेंद्र लवकरच पूर्णपणे बरे होतील.”

सध्या धर्मेंद्र आपल्या कुटुंबासोबत जुहू येथील निवासस्थानी असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहत्यांनी त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago