Govinda hospitalized in Mumbai
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा काही काळासाठी बेशुद्ध पडल्याने त्याला जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील स्वतःच्या घरी तो अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. त्याला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे कायदेशीर सल्लागार आणि मित्र ललित बिंदल यांनी याबाबत माहिती दिली.
गोविंदा मंगळवारी रात्री ८.३० वाजता अचानक बेशुद्ध झाला, त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याला काही औषधे देण्यात आली आणि औषध घेतल्यावर गोविंदाच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली. परंतु, रात्री सुमारे १२.३० वाजता त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर १ वाजता त्याला मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ६१ वर्षीय अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे आणि क्रिटीकेअर रुग्णालयात त्याच्या चाचण्या सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे बिंदल यांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…