मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तिला सशर्त परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने सांगितले की, अभिनेत्रीला अबुधाबीमधील भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावावी लागेल आणि 6 जून रोजी कोर्टासमोर हजेरी पत्रक सादर करावे लागेल. यासोबतच तिला अतिरिक्त सुरक्षा म्हणून एक लाख रुपये न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करावे लागतील.
रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती आणि याच कारणासाठी तिचा पासपोर्टही जमा करण्यात आला होता. रियाच्या वकिलाने न्यायालयात अर्ज केला होता की रियाला 2 जून ते 8 जून दरम्यान अबुधाबीला आयफा पुरस्कारासाठी जायचे आहे, त्यासाठी तिला तिचा पासपोर्ट देण्यात यावा. कोर्टाने अर्ज स्वीकारला आणि रियाला तिचा पासपोर्ट देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने तिला 5 जूनपर्यंत पासपोर्ट वापरण्याची मुभा दिली असून, 6 तारखेला पासपोर्ट चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवण्यास सांगितले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…