मनोरंजन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईत केलं लग्न

दुबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं. सोनालीने तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी दुबईत ४ जणांच्या उपस्थितीत लग्न केलं. तिच्या लग्नाला तिचे आई- बाबा आणि कुणालचे आई- बाबाही नव्हते. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केलं.

सोनाली आणि कुणाल जुलै महिन्यात विवाहबद्ध होणार होते. मात्र दोघांनी अचानक मे महिन्यातच लग्न केलं. सोनालीने स्वतः सोशल मीडियावर अचानक लग्न का केलं याची सविस्तर माहिती दिली.

अवघ्या दोन दिवसांत सोनाली आणि कुणालने लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका तासात लग्नाची खरेदी केली आणि १५ मिनिटांत अवघ्या चार लोकांच्या साक्षीने मंदिरात वरमाळा, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टी घेऊन विवाह प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.

सोनाली आणि कुणालने लग्नासाठी वापरण्यात येणारी रक्कम कोरोना विरुद्धच्या मदतनिधीसाठी देण्याचा निश्चय केला आहे. कुणाल बेनोडेकर हा मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर अॅडजस्टर म्हणून काम करतो. गेल्या वर्षी याच दिवशी अर्थात सोनालीच्या वाढदिवसाला दोघांनी दुबईत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago