Shilpa Shetty suffers a leg injury
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा शुटींग दरम्यान अपघात झाला असून त्यात तिचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिल्पा शेट्टी मागील अनेक दिवसांपासून रिएलिटी शो मध्ये जज म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे.
शिल्पा शेट्टीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत तिने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर माहिती देताना आपला पाय फॅक्चर झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय या अपघातामुळे आता शिल्पाला ६ आठवडे काम करता येणार नाहीये. दरम्यान, या अपघाताबाबत शिल्पा शेट्टीने एक फोटो ट्विट केला असून या फोटोमध्ये ती एका व्हील चेअरवरती बसल्याचं दिसून येत आहे. तर तिच्या डाव्या पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे. शिल्पा या फोटोमध्ये हसताना दिसून येतेय.
फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिलं कि, “वो कहते हैं न कि रोल, कैमरा ऍक्शन- ‘ब्रेक ए लेग’. त्या वाक्याला मी शब्दश: घेतलं असून ६ आठवडे आता काही करु शकणार नाही. तसंच मी लवकर बरी होऊन परत येईन तो पर्यंत दुआ में याद रखना.”
दरम्यान, वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, शिल्पा रोहित शेट्टीच्या आगामी वेब शो इंडियन पोलिस फोर्ससाठी शूटिंग करत आहे. रोहितने त्याच्या पहिल्या डिजिटल उपक्रमाच्या सेटवरून शेअर केलेल्या BTS क्लिपमध्ये, शिल्पा प्रचंड उत्साहाने ऍक्शन सीन करताना दिसत होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…