Sara Ali Khan said Kareena never tried to be our mother
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. करीना आणि सैफ या दोघांच लग्न होण्याआधी सैफला सारा अली खान आणि इब्राहम खान ही दोन मुलं होती. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये साराने तिच्या आणि करीनाच्या नात्याबद्दल सांगताना अनेक खुलासे केले.
सारा आणि सैफ दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी करणने साराला “करीनाला तू छोटी आई म्हणून हाक मारते का? असा प्रश्न विचारला. त्यावर हसत सारा म्हणाली, “माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करीना आमची दुसरी आई आहे असा दबाव टाकला नाही. त्यामुळे आम्हाला असं कधी वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. जर मी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली तर करीनाला धक्का बसेल. आणि ती म्हणेल काय? नाही. मी करीनाला के किंवा करीना नावाने हाक मारते. आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. जेव्हा करीना माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती तेव्हा ती म्हणाली होती की, हे बघ तुझी आई खूप छान व्यक्ती आहे. मला फक्त तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तिने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी तिला छोटी आई वगैरे म्हणाले असते तर कदाचित ती स्वतःच माझ्यावर वैतागली असती.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…