मनोरंजन

सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट, ‘हे’ आहे कारण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज सादर केला आहे. अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना सिद्धू मूसवाला प्रमाणे मारू, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान यांना ही धमकी मिळाली होती. तेव्हापासून सलमानची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, या धमकीनंतर सलमान खानने स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्राच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. यासंदर्भात आज सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.

गेल्या महिन्यात अभिनेत्याला धमकीचे पत्र मिळाले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सांगितले की, धमकीचे पत्र लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा प्रसिद्धी स्टंट आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कॅनडामध्ये असलेला बिष्णोईचा सहकारी विक्रम बरड याच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago