रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा जामीनही फेटाळण्यात आला आहे. NCB ने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली अटक केली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एनसीबीने कोर्टामध्ये रियाच्या जामिनाला विरोध दर्शवत युक्तीवाद केला. रिया चक्रवर्ती या प्रकरणातली आरोपी आहे. तिला जामीन मिळाला तर त्याचा परिणाम या प्रकरणावर होऊ शकतो, असं एनसीबीने कोर्टात सांगितलं. दरम्यान रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी कोर्टात बाजू मांडली. एनसीबीने रियाची चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे असं मानेशिंदे यांनी म्हटलं. मात्र कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…