मनोरंजन

ब्रेकिंग : सुशांतची बहीण प्रियंकाच्या अडचणीत वाढ, रियाने केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंकाविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (15 फेब्रुवारी) नकार दिला. परंतु, त्याची दुसरी बहीण मितूविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे. ही FIR सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने दाखल केली होती. पटना येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रिया चक्रवर्तीचे नाव मुख्य आरोपी म्हणून होते.

न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने एफआयआर रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. रियाने तिच्या एफआयआरमध्ये या दोघांवर दिल्लीत एका डॉक्टरांच्या सहकार्याने सुशांतसाठी बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा आरोप केला होता. रियाने 7 सप्टेंबर 2020 रोजी दाखल केलेल्या FIR मध्ये असे लिहिले होते की सुशांतने या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे घेणे सुरू केल्याच्या 5 दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला.

रियाचा आरोप आहे की, मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांनी प्रियंका आणि मितूच्या सांगण्यावरून ही औषधे ‘बेकायदेशीरपणे’ लिहून दिली होती. 6 ऑक्टोबर 2020 रोजी वकील माधव थोरात यांच्यामार्फत सुशांतच्या दोन्ही बहिणींनी याचिका दाखल करून एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती.

मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, प्रियांका सिंह विरोधात खटला चालविला जाईल आणि तिच्याविरोधात चौकशी करण्यात कोणताही अडथळा येऊ नये. ही औषधे खाल्ल्याने आणि औषधांचे कॉम्बिनेशन चुकीचे झाल्यामुळे सुशांतचा मृत्यू झाल्याची भीती रियाने व्यक्त केली होती. यावर सुशांतच्या दोन बहिणींनी आरोप केला होता की सुशांतच्या मृत्यूची सुरू असलेली चौकशी भटकावण्यासाठी रियाने FIR दाखल केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago