मनोरंजन

गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात, डोके आणि बरगडीला दुखापत, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली. ज्यामध्ये गायकाला कोपर, बरगडी आणि डोक्याला दुखापत झाली आहे. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडून जखमी झाले. त्यांच्या कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. कपाळावर आणि डोक्यालाही मार लागला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुबिन नौटियाल यांच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसेच सध्या डॉक्टरांनी त्यांना उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

काल गाण्याच्या लाँचनंतर झाला अपघात
नुकतेच, जुबिन नौटियाल यांचे ‘तू सामने आए’ हे गाणे रिलीज झाले. जुबिन यांनी हे गाणे योहानीसह गायले होते. गुरुवारी, नौटियाल आणि योहानी गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र दिसले होते. यानंतरच त्यांना दुखापत झाली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago