Popular actor Atul Parchure suffering from cancer
मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या विनोदांनी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अतुल कॅन्सरने ग्रस्त आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
अतुल परचुरे यांनी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आजाराशी संबंधित माहिती शेअर केली. अतुल यांनी सांगितले कि, माझ्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली होती. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होतो, तेव्हा सर्व काही ठीक होते. पण काही दिवसांनी मला जेवायला त्रास होऊ लागला. मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. तब्येत बिघडल्यावर भावाने औषध आणून दिले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर मी अनेक डॉक्टरांकडे गेलो.
ते पुढे म्हणाले, यादरम्यान माझी अल्ट्रासोनोग्राफी झाली. त्यावेळी मला डॉक्टरांच्या डोळ्यात भीती दिसली, तेव्हा मला वाटले की काहीतरी बरोबर नाही. तेव्हा मला कळले की माझ्या यकृतामध्ये 5 सेमी लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची आहे. मी डॉक्टरांना विचारले की मी बरा होईल की नाही? त्यावेळी भविष्यात सर्व काही ठीक होईल, अशी ग्वाही डॉक्टरांनी दिली. पण उपचाराचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला आणि माझी प्रकृती पूर्वीपेक्षा जास्तच बिघडली. शस्त्रक्रियेलाही विलंब झाला. हा आजार योग्य वेळी समजला, पण उपचाराची पहिली प्रक्रिया चुकली. माझ्या स्वादुपिंडावर याचा परिणाम झाला. त्यामुळे वेदनाही वाढल्या होत्या. योग्य उपचार न मिळाल्याने माझी प्रकृती बिघडली होती. मला नीट बोलता येत नव्हते. बोलतांना जीभ लटपटायची. डॉक्टरांनी सांगितले की, या स्थितीत मला थोडा वेळ थांबावे लागेल. आता शस्त्रक्रिया केल्यास कावीळ होण्याची भीती आहे. माझ्या यकृतात पाणी भरल्यामुळे माझा मृत्यूही होऊ शकतो. त्यानंतर मी माझे डॉक्टर बदलले आणि स्वतःवर योग्य उपचार केले.
अतुल परचुरे एक लोकप्रिय मराठी अभिनेता आहेत. सध्या ते द कपिल शर्मा शोचा भाग आहेत. अतुल परचुरे म्हणाले, मी बऱ्याच दिवसांपासून द कपिल शर्मा शो करत आहे. सुमोनाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी मला बोलावलं होतं. पण कॅन्सरमुळे मी जाऊ शकलो नाही. कॅन्सर झाला नसता तर कपिलसोबत आंतरराष्ट्रीय सहलीला गेलो असतो. रिपोर्ट आल्यावर समजेल की मी पूर्वीप्रमाणे बरा झालो की नाही.
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ व्यतिरिक्त 56 वर्षीय अतुल परचुरे ‘आर.के. ‘लक्ष्मण की दुनिया’, ‘जागो मोहन प्यारे आणि भागो मोहन प्यारे’ सारख्या शोसाठी ओळखले जातात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…