ईडीने सोमवारी सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. मात्र या चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, तसंच रियावर मनी लॉड्रिंग म्हणजे आर्थिक अनियमितता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे तिचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान,ईडी कार्यालयात जवळपास ९ तास इंद्रजीत आणि शोविकची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये या दोघांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. रिया आणि कुटुंबीयांसोबतच एक्स मॅनेजर श्रुती मोदी, सुशांतचा रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रियाच्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये तिची मिळकत आणि खर्च यांच्यात बरच अंतर आहे. याशिवाय रियाने तिच्या मालमत्तेबद्दल कोणतीही समाधानकारक माहिती ईडीला दिली नाही.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…