मनोरंजन

गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन

गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांनी रविवारी गोरेगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आज पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीतकार अभिलाष यांनी १९८५ मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटासाठी लिहीलेली प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे देना दाता…’ विशेष गाजली. या प्रार्थनेचा 8 भाषांमध्ये अनुवाद देखील करण्यात आला आहे. आजही अनेक शाळांमध्ये ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेसोबतच अभिलाष यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘तुम्हारी याद के सागर में’, ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ ही गाणी रचली होती. याशिवाय ‘रफ्तार’, ‘जहरिली’, ‘सावन को आने दो’, ‘लाल चूडा’, ‘हलचल’ आणि ‘मोक्ष’ सारख्या चित्रपटांसाठीदेखील त्यांनी गाणी लिहिली होती. गीतकार अभिलाष यांना माजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांच्या हस्ते ‘कलाश्री पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते.

13 मार्च 1946 रोजी दिल्लीत अभिलाष यांचा जन्म झाला. अभिलाष यांचे वडील व्यावसायिक होते. अभिलाष यांची रूची कला-साहित्यक्षेत्राकडे होती. वयाच्या 12व्या वर्षापासूनच अभिलाष कविता लिहायला लागले होते. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी कवितांचे कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.

अभिलाष यांना यकृताचा कर्करोग झाला होता. गेल्या 10 महिन्यांपासून आजार बळावल्याने ते अंथरुणाला खिळले होते. या आजारपणात जवळचे सगळे पैसे संपले. त्यांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रखडली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago