मनोरंजन

दिवंगत गायक केके पंचतत्वात विलीन, मुंबईत करण्यात आले अंत्यसंस्कार

मुंबई : गायक केके (कृष्णकुमार कुन्नथ) पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. केके यांची मुलगी तमाराने वडिलांच्या फ्यूनरल कार्डसोबत एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिले ‘लव्ह यू फॉरेव्हर डॅडी’. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी कुटुंबीयांनी सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ ठेवली होती.

दुपारी १ वाजता अंधेरीस्थित त्यांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. सुदेश भोसले, अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक यांच्यासह अनेक कलाकारांनी केके यांच्या घरी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

केके यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले होते. कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ CMRI (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केके यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नोंदवले आहे. कोलकातास्थित न्यू मार्केट पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, केके यांच्या चेहरा आणि डोक्यावर जखमा आढळल्या आहेत. केके यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसाची अवस्था गंभीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या पोस्टमॉर्टेमचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

10 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago