KRK Changed His Name On Twitter As Kamaal Rashid Kumar By Removing Khan Surname
मुंबई : अभिनेता कमाल रशीद खान उर्फ केआरके सोशल मीडियावर त्याच्या काही ट्वीट्स किंवा वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. बॉलीवूडला दररोज टार्गेट करणारा केआरके जवळपास प्रत्येक चित्रपटाबद्दल आपले विचार लोकांसोबत शेअर करतो. आपल्या चित्रपटांच्या रिव्ह्यूजमुळे नेहमीच चर्चेत असणार्या केआरकेने पुन्हा एकदा आपल्या एका ट्विटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केआरकेने ट्विटर हँडलवर आपले नाव बदलले आहे.
केआरकेने नुकतीच अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये केआरकेने त्याच्या ट्विटर हँडलवर नावातील बदलाची घोषणा केली आहे. त्याच्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले की, “आज मी माझ्या नावातून खान हटवून माझ्या नावासोबत माझ्या पत्नीचे आडनाव ‘कुमार’ जोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या पत्नीचे नाव अनिता कुमार आहे. तर आता माझे नाव कमाल रशीद कुमार आहे.
यासोबतच त्याने आपल्या ट्विटर हँडलवर आपले नाव बदलून कमाल रशीद कुमार असे केले आहे. केआरकेचे नाव बदलण्याचा हा निर्णय खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, त्याने या निर्णयामागचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. कमाल खान अनेकदा बॉलिवूड आणि त्यातील कलाकारांवर निशाणा साधताना दिसतो.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…