Categories: मनोरंजन

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी पाटणा पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. के.के. सिंह यांच्या तक्रारीनुसार, रियाने सुशांतला फसवलं. तिने त्याच्याकडून पैसे घेतले. तसेच त्याला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे ते म्हणाले. या तक्रारीनुसार रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात  रियावर आयपीसी 341, 342, 380, 406, 420, 306 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटणाचे पोलीस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांनी राजीव नगरचे ठाण्याचे प्रभारी यांना मुख्य तपास अधिकारी बनवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीला मुंबईत पाठवण्यात आले आहे. ही टीम मुंबई पोलिसांसोबत चौकशी करणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago