बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीस देखील करत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बिहार पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत.
सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती. दिशा सालियन आणि सुशांत यांच्या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचाही तपास बिहार पोलीस करत आहेत, आता याप्रकरणी बिहार पोलीस सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार आहे.
दिशा सालियनच्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली. सुशांतने आत्महत्येच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी बरेच सिमकार्ड्स बदलले होते. सुशांतच्या सर्व कॉल्सचे रेकॉर्ड ट्रॅक करत असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…