मनोरंजन

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोला उपचारासाठी रायपूरला पाठवण्याची तयारी, प्रकृती स्थिर

मुंबई : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदो याचा मंगळवारी अपघात झाला. या अपघातामध्ये सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहदेव दिरदोचा अपघात झाल्यापासून चाहते त्याची प्रकृती सुधारण्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. अपघातानंतर सहदेव बेशुद्धच होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा शुद्ध आली. आता सहदेवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

सहदेवला रात्री उशिरा जगदलपूर येथील डिमरापाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. तथापि, सुकमा जिल्हा रुग्णालयातच सहदेवच्या डोक्याला 5 टाके टाकण्यात आले होते. दुसरीकडे जगदलपूरच्या डिमरापाल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅननंतर सहदेवला 12 तास आयसीयूमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले होते. सहदेवची प्रकृती आता स्थिर असून तो बोलतही आहे. त्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे.

सध्या सहदेवच्या प्रकृतीवरचा धोका टळला आहे. सिटी स्कॅन अहवालातही कोणतीही गंभीर दुखापत नाही. मात्र, डिमरापाल रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने नातेवाइकांच्या विनंतीनंतर सहदेवला अधिक उपचारासाठी रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे.  जिथे पुन्हा एकदा त्याचे सिटी स्कॅन केले जाणार आहे. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले की, रात्री उशिरापासून सहदेवला आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago