Arijit Singh’s mother dies of Covid-19 in Kolkata
कोलकाता : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्या आईचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अरिजितच्या आईला कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज (20 मे) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अरिजीत सिंग यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु होते, परंतु तिची परिस्थिती सुधारत नव्हती. आज 20 मे रोजी सकाळी त्यांची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली ज्यानंतर डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.
दरम्यान, अरिजितच्या आईची प्रकृती चिंताजनक असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते आणि त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. अरिजीत सिंग यांच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी आणि चित्रपट निर्माते श्रीजित मुखर्जी यांनी प्रथम दिली होती. त्यांनी अरिजीतच्या आईसाठी ‘A निगेटिव्ह’ रक्तदात्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली होती.
स्वस्तिका मुखर्जी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती आणि लिहिले होते की, ‘अरिजीत सिंगच्या आईसाठी ‘A निगेटिव्ह’ रक्ताची गरज आहे. त्यांना अमरी धाकुरिया रुग्णालयात दाखल केले असून आजच त्याची गरज आहे.’ आता त्यांची पोस्ट हटविण्यात आली आहे.
श्वेताचे दुर्दैव आहे की… राजा चौधरीची श्वेता आणि अभिनव यांच्यातील भांडणावर प्रतिक्रिया
कंगना रनौतने केले अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक, म्हणाली…
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…