मनोरंजन

मुंबईत अभिनेत्रीवर चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं.

अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत तिची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्याने स्वतःची निर्माता म्हणून ओळख करून दिली होती. कामानिमित्त मालवी त्याला फक्त एकदाच भेटली होती. सोमवारी ती आपल्या घराबाहेर पडली. त्यावेळी हल्लेखोर कार घेऊन बाहेर थांबला होता. त्याने मालवीला भर रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध केला. त्यावर त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. तिच्यावर चार वार केले. हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

मालवी मल्होत्रा हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी योगेश महिपाल सिंह विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. मालवी हिने काही बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

22 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago