मनोरंजन

अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

मुंबई : अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती घरीच विलगीकरणात असून सर्व नियमांचं पालन करत आहे. तिने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सहा दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता हिनाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. “सध्या मी आणि माझं कुटुंब कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाच माझा कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी होम क्वारंटाईन झाले असून सर्व प्रोटोकॉलचं पालन करतेय. जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांना विनंती करते की त्यांनी करोना चाचणी नक्की करून घ्यावी. तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.” अशी पोस्ट हिनाने केली आहे.

21 एप्रिलला हिना खानच्या वडिलांचं कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं होतं. यावेळी हिना खान तिच्या एका प्रोजेक्टच्या शुटींगसाठी काश्मिरमध्ये होती. वडिलांच्या निधनानंतर चार दिवसांनी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही दिवस सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं.

ती पोस्ट मध्ये म्हणाली होती कि, माझे वडिल 21 एप्रिल 2021 रोजी स्वर्गवासी झाले. ज्यांनी ज्यांनी माझ्या या कठिण काळात माझं सांत्वन केलं, त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटूंब अजुनही सावरू शकलो नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस मी सोशल मिडीयावरून ब्रेक घेतेय. माझी टीम माझ्या सर्व प्रोजेक्टबद्दल माहिती देईल. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी खूप खूप आभार.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago