कोरोना

महाराष्ट्रात १ मेपासून होणाऱ्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह…

मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या नाहीत.

भारत बायोटेक आणि सिरम यांच्या लसी केंद्राने आधीच बुक केल्या आहेत. त्यामुळे त्या ऑर्डर पूर्ण झाल्यानंतरच राज्यांना या लसीचा साठा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे राज्याने या कंपन्यांना आता ऑर्डर दिली, तरी मे महिन्यामध्ये या लसी राज्याला उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लसीच उपलब्ध नसल्यामुळे आता 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं लसीच्या संदर्भात ‘भारत बायोटेक’ला पत्र लिहिल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवायची असल्यास सरकारला १२ कोटी डोसेसची गरज लागणार आहे. त्यामुळं पुढील सहा महिन्यांत को-वॅक्सिनचे नेमके किती डोस उपलब्ध होऊ शकतात व त्याची किंमत काय असेल याची माहिती मागवण्यात आली आहे, असं व्यास यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी घेतला हा निर्णय : 

मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल चहल यांनी म्हटलं कि, जोपर्यंत राज्य सरकारकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नाही, तोपर्यंत मुंबईत लसीकरण सुरू होणार नाही.

‘पुढे ते म्हटले कि, लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आम्ही नेहमीच दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र, हे लक्ष्य आम्हाला एकदाही पूर्ण करता आलेलं नाही. लसीचा तुटवडा हे यामागील कारण होतं. त्यामुळंच लसीचा पुरेसा साठा झाल्यानंतरच १८ वर्षांवरील मुंबईकरांसाठी लसीकरण सुरू करण्याचा आमचा मानस आहे. राज्य सरकारलाही आम्ही याबाबत कळवलं आहे,’ असं ते म्हणाले.

मुंबईत १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या ५० ते ६० लाखांच्या घरात आहे. या सर्वांच्या लसीकरणासाठी आम्हाला किमान १ कोटी २० लाख डोसची गरज लागणार आहे. महापालिका स्वत:हून लस घेऊ शकत नाही. त्यामुळंच पुरवठ्याची हमी मिळत नाही तोपर्यंत फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू ठेवण्यात येईल. या निर्णयावरून टीका झाली तरी त्यास सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कारण, आमची भूमिका व्यवहार्य आहे. लसीचा पुरेसा साठा नसताना लोकांना लसीकरणासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन करणं निरर्थक आहे,’ असं ते म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago