Actor Pandu
अभिनेता पांडू यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. ते तमिळ चित्रपटांमधील लोकप्रिय हास्यकलाकार होते. पांडू यांच्या पत्नी कुमुधा यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. पांडू यांच्या पश्चात पत्नी कुमुधा आणि तीन मुले प्रभु, पाचू आणि पिंटू असा परिवार आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पांडू चित्रपटांमध्ये विनोदी पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. काही दिवसांपूर्वी पांडू आणि त्यांच्या पत्नी कुमुधा यांना कोरोनाची लक्षणं जाणवली होती. त्यानंतर त्यांनी चाचणी केली असता ती चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघेही चेन्नईमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, कोरोनामुळे त्यांची अवस्था गंभीर झाली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
पांडू यांच्या पत्नी कुमुधा यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पांडू यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक बड्या कलाकारांनी पांडू यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. पांडू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमार यांच्या ‘कढ़ल कोटाई’ चित्रपटात हास्यकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर पांडू यांनी अनेक चित्रपटात काम केलं. अभिनेता विजयच्या ‘घिल्ली’ चित्रपटात पांडू यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्यांचं विनोदाचं टायमिंग प्रचंड आवडत होतं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…