मनोरंजन

आमिर खानने घेतला मोठा निर्णय, आमिर आता नाही वापरणार मोबाईल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमिर खानने मोबाईलचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिरने आपल्या पुढील चित्रपटासाठी ही वेगळीच पद्धत अवलंबली आहे. फोन सतत त्याच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, असं आमीरचं म्हणणं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये त्याचा फोन अडथळा ठरू नये, म्हणून अभिनेत्याने हे पाऊल उचलले आहे.

आमिर खानचा हा चित्रपट देखील ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होईल. ‘लालसिंग चड्ढा’ मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात मोना सिंग देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मोनाने 3 इडियट्समध्ये आमिर-करीनाबरोबरही काम केले आहे. या चित्रपटामध्ये हे तिघे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळतील.

आमिर खानचे ख्रिसमस रिलीज चित्रपट कायमच हिट ठरले आहेत. पीके, दंगल, धूम 3, तारे जमीन पर आणि गजनी. आमिर या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या 100% योगदानासाठी ओळखला जातो. आता आमिर खान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत आवश्यक गोष्टींना महत्त्व देत आणि मोबाईल पासून दूर राहून आमिरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून का मानले जाते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago