शैक्षणिक

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त जागांसाठी प्रवेश घेण्याची संधी आहे. आजपासून (१ जानेवारी) त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेशअर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर समुपदेशन फेरी गुरुवारी संपली. याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी म्हणून शुक्रवारपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. पाच जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ही फेरीही समुपदेशन फेरीप्रमाणे असून थेट संस्थास्तरावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

समुपदेशन फेरी :

  1. २ जानेवारीला सर्व आयटीआयमधील रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
  2. १ ते ४ जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधून संबंधित संस्थेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी.
  3. ५ जानेवारीला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
  4. ६ व ७ जानेवारी असे दोन दिवस गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप होणार आहे. याच दरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी, शुल्क भरून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील जागा व प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरता येणार आहेत. ही प्रक्रिया ८ ते १५ जानेवारीपर्यंत असणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक माहिती संचालनालयाच्या वेबसाइटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago