अर्थकारण

टाटा शेअरधारकांसाठी आनंदाची बातमी! टाटा समूहानी दाखवला जलवा, TCS-टाटा मोटर्सने केली कमाल, दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची उच्चांकी मजल

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) स्टॉकमध्ये सतत तेजीची हिरवळ दिसत होती तर अलीकडेच टाटा मोटर्सचे शेअर देखील तेजीच्या वाटेवर स्वार झाले. चालू आठवड्यात भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रचंड चढ-उतार दिसून आले असून या काळात दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी उच्चांकी मजल मारली. दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी टीसीएसने अवघ्या पाच मिनिटांत २२,४५० कोटींची कमाई केली.

विशेष बाब म्हणजे अर्थसंकल्पाच्या दिवसापासून कंपनीच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांहून अधिक वधारले असून या कालावधीत कंपनीला ३४,५०० कोटी रुपयांहून अधिक नफा झाला. त्याचेवेळी, दोन दिग्गज कंपन्यांच्या तेजीचा टाटा समूहालाही फायदा झाला असून टाटा समूह शुक्रवारी ४०० अब्ज डॉलर्सचे एकत्रित मूल्य पार करणारा पहिला भारतीय समूह बनला आहे.

टाटा समूहाच्या देशांतर्गत बाजारात २६ कंपन्या सूचीबद्ध असून त्यांनी गेल्या वर्षी शंभर अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली. समूहाचे एकूण बाजार भांडवल जूनच्या नीचांकी पातळीपासून १५.४% वधारले असून शुक्रवारी बाजार बंद होऊन ४०१ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३३.६ लाख कोटींवर पोहोचले आहे.

टीसीएसचे एकूण मार्केट कॅप १९० अब्ज डॉलर्स असून टाटा समूहात ४७% योगदान देते. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनीच्या शेअर्सनी शुक्रवारी ४,४२२.४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर माजली असून टीसीएस व्यतिरिक्त टाटा समूहाची दुसरी सर्वात मोठी कंपनी – टाटा मोटर्स- चे शेअर्स देखील ऑल-टाइम उच्चांकावर ट्रेंड करत आहेत. जागतिक ब्रोकरेज नोमुराकडून रेटिंग अपग्रेड झाल्यानंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गेल्या तीन सत्रांमध्ये १२% पर्यंत तेजी नोंदवली डेली. टाटा मोटर्सला जग्वार लँड रोव्हर (JLR) मधून लक्षणीय फायदा होऊ शकतो, ज्यामुळे कंपनीच्या नफ्यात आणखी वाढ होईल असा ब्रोकरेजने विश्वास दाखवला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago