nirmala sitaraman
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली होती, पण तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
बचत खात्यांवरील व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली होती. त्यामुळ व्याजदर 4.0% वरून 3.5% वर येणार होता, मात्र आता तो 4 टक्केच राहणार आहे. सुकन्या समृद्धि खाते योजने अंतर्गत उपलब्ध व्याजदर 7.6% टक्केच राहणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर 6.8 टक्केच राहणार आहे. पीपीएफ योजनेवरील व्याजदर सध्या जो आहे तोच 7.1 टक्के राहणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्के कायम राहणार आहे. तसेच किसान विकास पत्राचा व्याज दर कमी होणार नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…